थकबाकी न भरणाऱ्या मालमत्ता धारकांची मालमत्ता जप्तीची कारवाई पुढील आठवड्यापासून होणार

जळगाव : :-महानगरपालिकेची मालमत्ता कर व पाणीपट्टी ची थकबाकी न भरणाऱ्या मालमत्ता धारकांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई पुढील आठवड्यापासून करण्यात येणार असल्याचे आदेश आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिले असून वसुली करण्यासंदर्भातही ढेरे यांनी उपायुतांसह सहाय्यक आयुक्तांना निर्देश दिले आहेत प्रभाग समिती एक ते चार चा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी सोमवारी दोन रोजी आढावा बैठक घेऊन थकबाकी संदर्भात आणि वसुली करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना केल्यात.
पाच वर्षांपासून ज्या मालमत्ता धारकांकडे मागील थकबाकी आहे, अशा मालमत्ता धारकांना जप्तीच्या नोटीस बजावून प्रथम नळ संयोजन बंदची कारवाई करा, मात्र जे भरणाभरणा करणार नाहीत, अशा थकबाकीदारांवर पुढील आठवड्यात त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच मालमत्ता धारकांनी लवकरात लवकर कराचा भरणा करून जप्तीची कारवाई टाळावी व जळगाव महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे व महसूल उपायुक्त धनश्री शिंदे यांनी केले आहे. या बैठकीदरम्यान प्रत्येक
प्रभाग समिती कार्यालयास सन २०२४-२५ चे वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले. प्रभाग समिती क्रमांक १ ते ३ करिता मागणीच्या ८० टक्के इतके व प्रभाग समिती क्रमांक ४ साठी मागणीच्या ९०% निश्चित करून देण्यात आले.