Other

मण्यारखेडा शाळेत गोदावरी आयएमआरतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

मण्यारखेडा शाळेत गोदावरी आयएमआरतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

जळगाव : ग्लोबल हँडवॉशिंग डे अर्थात जागतिक हात धुणे दिनानिमित्त गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (आयएमआर), जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे मण्यारखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आरोग्य व स्वच्छता जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच वैयक्तिक स्वच्छतेच्या चांगल्या सवयी रुजविणे आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाला माजी सरपंच राजूदादा, ग्रामसेविका आणि शाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ कोळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी एनएसएस स्वयंसेवकांनी शालेय विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. हात योग्य पद्धतीने कसे धुवावेत, याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. जेवणापूर्वी, शौचालयाचा वापर केल्यानंतर तसेच हात अस्वच्छ झाल्यावर साबणाने हात धुणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. नियमित हात धुण्याच्या सवयीमुळे अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.उपक्रम यशस्वीतेसाठी एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. स्मिता चौधरी, क्रीडा संचालक प्रा चंद्रकांत डोंगरे, एनएसएस सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा दीपक दांडगे आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button