Education

गोदावरी अभियांत्रिकीच्या सुदीक्षा राजपूतची सॉफ्टवेअर डेव्हलपर पदावर निवड

गोदावरी अभियांत्रिकीच्या सुदीक्षा राजपूतची सॉफ्टवेअर डेव्हलपर पदावर निवड

जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेच्या २०२७ बॅचमधील विद्यार्थिनी सुदीक्षा राजपूत हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिची ब्रँन्डग्लो या नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर या पदावर निवड झाली आहे.

सुदीक्षाने आपल्या शैक्षणिक प्रवासात संपादन केलेले ज्ञान, तांत्रिक कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर ही यशस्वी कामगिरी केली आहे. तिच्या या निवडीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते सुदीक्षाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. विजयकुमार वानखेडे, प्रा. निलेश वाणी, प्रा. प्रशांत शिंपी, प्रा. कोमल पाटील आणि प्रा. देवपाल यादव उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी सुदीक्षाचे अभिनंदन करून तिच्या पुढील व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षणासोबतच उद्योगक्षेत्राच्या गरजेनुसार कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील आहे. सुदीक्षाच्या या यशामुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनाही करिअरच्या दृष्टीने प्रेरणा मिळणार आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button