Detection

यावलची महिला कोठडीत, भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी केली अटक

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । भुसावळ बस स्थानकावर बसमध्ये चढताना एका वृद्ध महिलेची सोन्याची पोत लंपास करणाऱ्या संशयीत महिलेला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अत्यंत चातुर्याने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी या कारवाईत ३ लाख २० हजार रुपये किमतीची २२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत हस्तगत केली आहे.

नेमकी घटना काय?
मुक्ताईनगर येथील शिवराय नगरमधील रहिवासी कुसुम देवीदास चौधरी (वय ६२) या २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास भुसावळ बस स्थानकावरून चोपडा बसमध्ये चढत होत्या. गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील २२ ग्रॅम सोन्याची पोत चोरून नेली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. १९४/२०२६) दाखल करण्यात आला होता.

अशी झाली कारवाई
जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी तपासाची चक्रे फिरवली. डी.बी. पथकातील कर्मचाऱ्यांनी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कुल्सुमबी मुश्ताक शेख (रा.यावल हिस) या महिलेला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली आणि तिच्याकडून चोरीला गेलेली ३ लाख २० हजार रुपयांची २२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत पोलिसांनी जप्त केली.

तपास पथकात यांचा होता सहभाग
पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे विजय नेरकर, कांतीलाल केदारे, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, अक्षय कोतकर, योगेश माळी, चंद्रकांत रायपूरकर, जावेद शहा, भूषण चौधरी, अमर अठाडे, दिलीप कोल्हे, जिवन कापडे, हर्षल महाजन आणि शिल्पा राठोड या कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कामगिरी बजावली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button