ईद ए मिलाद ऊन नबी कमिटीतर्फे प्रशासनाचे आभार


ईद ए मिलाद ऊन नबी कमिटीतर्फे प्रशासनाचे आभार
जळगाव प्रतिनिधी मुस्लिम बांधवांचा पवित्र सण जशने ईद ए मिलाद ऊन नबी निमित्त मुस्लिम बांधव जुलूस काढून आनंदात व उत्साहात ईद साजरी करतात.
यावर्षी ईद साठी संपूर्ण जळगांव जिल्हा पोलीस प्रशासनाने योग्य बंदोबस्त ठेऊन चांगल्या प्रकारे कायदा व सुव्यवथा अबाधित राखली. तसेच जळगांव शहर महानगर पालिका तर्फे ईद साठी संपूर्ण शहरात व खास करून मुस्लिम बहुल भाग, धार्मिक स्थळ असलेला भाग व मुख्य म्हणजे जुलूस निघणाऱ्या मार्गाचे खड्डे एका रात्रीत बुजविण्यात आले व आरोग्य विभागातर्फे सफाई कर्मचारी थांबून झाडू मारून साफ सफाई करण्यात आली. पोलीस व म. न. पा. प्रशासनाने योग्य नियोजन करून ईद ए मिलाद ऊन नबी मुस्लिम बांधवांना आनंदात व उत्साहात निर्विघनपणे साजरा करता यावी म्हणून अथक परिश्रम घेतले. म्हणून आज मरकझी जुलूसे ईद ए मिलाद ऊन नबी कमिटी तर्फे जळगांव जिल्हा पोलीस दल व जळगांव शहर महानगर पालिकेचे आभार मान्यता आले. याप्रसंगी जळगांव शहर महानगर पालिकेचे आयुक्त आदित्य जिवने सो., आरोग्याचे अतिरिक्त उपायुक्त समीर बोरोले सो., तसेच जळगांव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सो., अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित सो., उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे सो., शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम सो., तसेच सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचे पुष्पगुछ देऊन हार्दिक सत्कार करून आभार मानन्यात आले.
याप्रसंगी सुन्नी जामा मस्जिद जळगांव व जुलूसे ईद ए मिलाद ऊन नबी कमेटीचे सै. अयाज अली नियाज अली, सय्यद जावेद, मुश्ताक बहेस्ती, अमान बिलाल, कामिल खान, काशिफ टेलर, मुस्तुफा बहेस्ती, इमाम भाया, सय्यद उमर, झिशान हुसैन,आसिफ शाह, जमील शेख, शफी ठेकेदार, अशफाक शाह,सिराज अली, हाशिम कुरेशी इ. उपस्थित होते.







