Other

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे रुजू; डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोपविली सूत्रे

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात आज पदभार हस्तांतरणाचा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत ढीवरे यांच्याकडे पोलीस दलाची सूत्रे अधिकृतपणे सुपूर्द केली. यावेळी जळगाव पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नूतन अधीक्षकांचे स्वागत केले.

याप्रसंगी मावळते पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांना पोलीस दलाच्या वतीने निरोप देण्यात आला. डॉ. रेड्डी यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अत्यंत प्रभावी काम केले. गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासोबतच त्यांनी राबवलेले विविध जनहितार्थ उपक्रम आणि प्रशासकीय सुधारणांबद्दल सहकाऱ्यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची आठवण यावेळी विविध अधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून करून दिली.

पदभार स्वीकारल्यानंतर नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत ढीवरे यांचे जळगाव पोलीस परंपरेनुसार स्वागत करण्यात आले. श्रीकांत ढीवरे यांना पोलीस दलातील कामाचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दल अधिक सक्षम, पारदर्शक आणि गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सर्वसामान्यांना वेळेत न्याय मिळावा आणि पोलीस दल अधिक लोकाभिमुख व्हावे, या दृष्टीने त्यांनी पहिल्याच दिवशी कामाचा धडाका सुरू केला आहे. या बदलामुळे आता जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनात एक नवी ऊर्जा पाहायला मिळणार आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button