Detection

जळगाव शहरात गोळीबार करणारे ६ आरोपी रामानंद नगर पोलिसांच्या जाळ्यात

महा पोलीस न्यूज । दि.३० एप्रिल २०२५ । जळगाव शहरातील सेंट जोसेफ शाळेसमोरील मीनाताई ठाकरे मार्केट येथे दि.२४ एप्रिल रोजी रात्री एका तरुणावर गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी ६ संशयीत आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी गावठी बनावटीचे पिस्टल हस्तगत केले असून घटनास्थळावरुन एक जिवंत काडतुस (राऊंड), दोन खाली केस व कोयता हस्तगत करण्यात आला आहे.

शहरातील सेंट जोसेफ शाळेसमोरील मीनाताई ठाकरे मार्केट येथे दि.२४ एप्रिल रोजी रात्री ९.३० वा.चे फिर्यादी महेद्र समाधान सपकाळे, वय २० वर्षे, रा.प्रबुध्द नगर, पिंप्राळा हा आपला मित्र भुषण अहिरे याचा वाढदिवस साजरा करण्याकरीता येथे आले होते. यातील फिर्यादी आणि आरोपी यांचे पुर्व वैमनस्य असल्याने इतरांनी हातामध्ये कोयते आणि देशी बनावटीचा गावठी कट्टा घेऊन फिर्यादी यांचे वर फायरींग करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. हल्ल्यात फिर्यादीच्या पाठीमागील बाजुस कमरेच्या खाली गोळी लागल्याने तो जखमी झाला होता.

६ संशयीत पोलिसांच्या जाळ्यात
रामानंद नगर पोलिसांनी विशाल भिका कोळी, (पिस्टलसह), अक्षय उर्फ बाब्या बन्सीलाल धोबी, धिरज उर्फ वैभव उर्फ गोलु कोळी, सागर अरुण भोई उर्फ जाडया भोल्या, नितेश मिलिंद जाधव, गिरीश किशोर घुगे यांना अटक करण्यात आली असून आरोपी गिरीश किशोर घुगे याचेकडुन गावठी बनावटीचे पिस्टल हस्तगत केले आहे. तसेच गुन्ह्यातील घटनास्थळावरुन एक जिवंत काडतुस (राऊंड), दोन खाली केस व कोयता हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपींवर यापूर्वी अनेक गुन्हे
पोलिसांनी आरोपींचा मागील रेकॉर्ड काढला असता गुन्हयातील आरोपी नामे विशाल भिका कोळी याचेवर जळगांव शहरात तसेच रामानंदनगर पोलीस स्टेशन अंतर्गत ११ गुन्हे दाखल असुन त्याचेवर म.पो.का. कलम ५६ (१) (ब) प्रमाणे तसेच MPDA अंतर्गत प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली आहे. व आरोपी नामे अक्षय उर्फ बाब्या बन्सीलाल धोबी याचेवर जळगांव शहरात तसेच रामानंदनगर पोलीस स्टेशन अंतर्गत ८ गुन्हे दाखल असून त्याचेवर म.पो.का. कलम ५६ (१) (ब) प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. तसेच आरोपी नामे नितेश उर्फ गोल्या मिलिंद जाधव याचे विरुध्द जळगांव शहरात तसेच रामानंदनगर पोलीस स्टेशन अंतर्गत १५ गुन्हे दाखल असुन त्याचेवर म.पो.का. कलम ५६ (१) (ब) प्रमाणे तसेच MPDA अंतर्गत प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली आहे.

या पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या पथकातील सपोनि संदीप वाघ, उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे, स.फौजदार संजय सपकाळे, हवालदार जितेंद्र राजपुत, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, इरफान मलिक, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुखे, हेमंत कळसकर, विनोद सुर्यवंशी, उमेश पवार, रविंद्र चौधरी, प्रविण सुरवाडे अशांनी केली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button