CrimeHealth

मिथ्या छापाचा संशय; ८ लाखांचा पॅकेज्ड वॉटर साठा जप्त

मिथ्या छापाचा संशय; ८ लाखांचा पॅकेज्ड वॉटर साठा जप्त

नरडाना एमआयडीसीतील आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; तीन ब्रँडचे नमुने तपासणीसाठी पाठविले

धुळे, प्रतिनिधी : ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ या मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने नरडाना एमआयडीसी परिसरातील एका आस्थापनेची तपासणी करून सुमारे ८ लाख रुपयांचा पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचा साठा जप्त केला. सदर अन्नपदार्थ मिथ्या छापाचे व कमी दर्जाचे असल्याचा संशय असल्याने ही कारवाई करण्यात आली.

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यात अन्न सुरक्षा मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शिवाय बिव्हरेजेस एलएलपी, प्लॉट क्र. टी-११, नरडाना इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, नरडाना, ता. शिंदखेडा, जि. धुळे या आस्थापनेची तपासणी केली.

या तपासणीदरम्यान ‘पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर बरेली’, ‘पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर ग्रीष्मा एक्वा’ आणि ‘पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर एक्वा अजंता’ या तीन अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तसेच सदर अन्नपदार्थ मिथ्या छापाचे व कमी दर्जाचे असल्याचा संशय आल्याने उर्वरित ८० हजार २०८ पेट बॉटल्सचा साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची एकूण किंमत ८ लाख १ हजार ६३२ रुपये असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नमुने प्रयोगशाळेत

जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार संबंधित आस्थापनेविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

कारवाईत अधिकाऱ्यांचा सहभाग

ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त नाशिक मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) गो. वी. माहोरे, आनंद पवार, शशिकांत राणे, अन्न सुरक्षा अधिकारी अभिजीत जाधव, अरविंद राऊत आणि मंगेश भावसार यांनी केली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button