EducationHealth

जीवामृत, वर्मी कंपोस्टसह दशपर्णी अर्क निर्मितीचे प्रशिक्षण

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन; शेतकरी व बचत गटातील महिलांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

जीवामृत, वर्मी कंपोस्टसह दशपर्णी अर्क निर्मितीचे प्रशिक्षण

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन; शेतकरी व बचत गटातील महिलांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

चोपडा, प्रतिनिधी : नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळ, जळगाव (महाराष्ट्र शासन अंगीकृत) अंतर्गत प्रेरणा लोकसंचलित साधन केंद्र, चोपडा यांच्या वतीने जीवामृत, वर्मी कंपोस्ट, दशपर्णी अर्क तसेच गांडुळ खत निर्मिती व वापराबाबत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणातून शेतकरी व महिला बचत गटातील महिलांना नैसर्गिक शेतीतील विविध निविष्ठांची निर्मिती, त्यांचा योग्य वापर आणि शेती उत्पादनातील फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे तसेच कृषी विभागाच्या पथकाची आणि तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व, रासायनिक खतांचा वापर कमी करून जमिनीची सुपीकता टिकविणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे वळविण्याबाबत मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणादरम्यान जीवामृत तयार करण्याची पद्धत, आवश्यक साहित्य, त्याचे प्रमाण आणि पिकांमध्ये वापरण्याची पद्धत याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. तसेच वर्मी कंपोस्ट व गांडुळ खत निर्मितीची प्रक्रिया, गांडुळ संगोपन, खताची गुणवत्ता आणि शेतीतील उपयोग याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

दशपर्णी अर्काची निर्मिती आणि पिकांवरील विविध किडींच्या व्यवस्थापनासाठी त्याचा नैसर्गिक पद्धतीने उपयोग कसा करता येतो, याची माहिती देण्यात आली. स्थानिक पातळीवर उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्रीचा वापर करून कमी खर्चात शेतीसाठी आवश्यक निविष्ठा तयार करता येतात, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे व त्यांच्या पथकाने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत नैसर्गिक शेती करताना घ्यावयाची काळजी, पिकांची निगा, मातीचे आरोग्य आणि शेतीचा खर्च कमी करण्याच्या उपाययोजनांची माहिती दिली. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनीही नैसर्गिक शेतीचा अधिकाधिक अवलंब करून शाश्वत व पर्यावरणपूरक शेतीकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले.

‘नैसर्गिक शेतीचा स्वीकार—निरोगी माती, निरोगी पीक आणि समृद्ध शेतकरी’ या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button