CrimeSocial

कर्तव्य बजावताना मुक्या जीवाचीही काळजी

पीएसआय समाधान गायकवाड यांची पशुपक्ष्यांप्रती भूतदया; जखमी कबुतराच्या पंखातील काटे काढून दिला दिलासा

कर्तव्य बजावताना मुक्या जीवाचीही काळजी

पीएसआय समाधान गायकवाड यांची पशुपक्ष्यांप्रती भूतदया; जखमी कबुतराच्या पंखातील काटे काढून दिला दिलासा

अमळनेर, प्रतिनिधी : पोलिसी कर्तव्य बजावत असताना पशुपक्ष्यांप्रती संवेदनशीलता दाखवत अमळनेर पोलीस ठाण्यात कार्यरत पीएसआय समाधान गायकवाड यांनी जखमी कबुतराला मदतीचा हात दिला. त्यांच्या या कृतीचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

५ ऑक्टोबर रोजी एका कबुतराच्या पंखात काटेरी काटे टोचल्याचे पीएसआय गायकवाड यांच्या निदर्शनास आले. या दुखापतीमुळे कबुतराला उडता येत नव्हते. परिस्थिती लक्षात येताच त्यांनी कबुतराला सुरक्षितपणे हातात घेत पंखात टोचलेले काटे काळजीपूर्वक काढले.

त्यानंतर कबुतराला पाणी पाजून त्याला सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले. पोलिसी कर्तव्याबरोबरच मुक्या जीवांप्रती दाखविलेल्या या संवेदनशीलतेचे उपस्थितांनी कौतुक केले. त्यांच्या या कृतीतून पशुपक्ष्यांप्रती असलेली भूतदया आणि माणुसकीचा प्रत्यय आला.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button