कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ MARD GMC जळगावचे काळ्या फिती लावून आंदोलन

कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ MARD GMC जळगावचे काळ्या फिती लावून आंदोलन
जळगाव, दि. ९ जुलै : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्य बजावत असलेल्या महिला निवासी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हिंसक हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD) च्या राज्यव्यापी आवाहनाला प्रतिसाद देत MARD, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC), जळगाव येथील निवासी डॉक्टरांनी आज काळ्या फिती लावून शांततापूर्ण आंदोलन केले.
या आंदोलनाद्वारे निवासी डॉक्टरांनी वैद्यकीय क्षेत्रातील वाढत्या हिंसाचाराचा तीव्र निषेध व्यक्त करत, डॉक्टरांना सुरक्षित कार्यस्थळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. रुग्णसेवा अखंडित सुरू ठेवत निषेध नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला.
या आंदोलनाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगावचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बाविस्कर यांनी काळ्या फिती बांधून आपला जाहीर पाठिंबा दर्शविला. डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून आरोग्यसेवा देणाऱ्या प्रत्येक डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्याला सुरक्षित आणि भयमुक्त






