Social

खान्देशनी अहिराणी बोलीला गुगलनी मान्यता

अहिराणी मायबोलीसाठी अभिमाननी घडी

खान्देशनी अहिराणी बोलीला गुगलनी मान्यता

अहिराणी मायबोलीसाठी अभिमाननी घडी

विकास पाटील खान्देशनी मातीनी गोडवा, संस्कृतीनी ओळख आनि लोकजीवननी आत्मा म्हंजे अहिराणी बोली. वर्षानुवर्षे गावखेड्यात, शेतशिवारात, लोकगीतांत, गप्पागोष्टींत जपली गेलेली अहिराणी आता नवी उंचीवर पोचली शे. गुगलसारख्या जगप्रसिद्ध तंत्रज्ञान मंचावर अहिराणी बोलीला मान्यता मिळी गेली, ही खान्देशसाठी मोठी अभिमाननी गोष्ट शे.

आता अहिराणी भाषा इतर भाषांसारखी गुगल कीबोर्डवर टाईप करता येणार शे. डिजिटल दुनियामं आपली मायबोलीनं स्थान मिळणं म्हणजे फक्त तंत्रज्ञाननी सोय नाही, तर आपली ओळख, आपलो इतिहास आनि संस्कृतीला मिळालेली मोठी दाद शे.

या यशामागं अनेक वर्षांची मेहनत, सातत्य आनि भाषेवरील प्रेम लपलेलं शे. जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ, विविध सामाजिक-सांस्कृतिक संघटना, अहिराणी भाषा प्रेमी, साहित्यिक, कवी, बोली भाषा संवर्धक यांचा अथक प्रयत्न आज सफल ठरला शे. अनेकांनी अहिराणी बोली फक्त बोलण्यात नाही, तर लिखाण, कविता, लोकपरंपरा आनि साहित्याच्या माध्यमातून जिवंत ठेवायनी धडपड केली.

अहिराणी बोली ही फक्त भाषा नाही, तर खान्देशनी अस्मिता शे. गावोगावनी लोकजीवन, नातेसंबंध, हास्य, दुःख, परंपरा आनि माणुसकी या बोलीत जिवंत दिसे शे. आज गुगलनी मान्यता मिळणं म्हणजे नव्या पिढीला मायबोलीशी जोडायनी मोठी संधी मिळाली शे.

आता वेळ आली शे की आपण सगळ्यांनी अहिराणी अभिमानानं बोलवी, लिहवी आनि पुढल्या पिढीपर्यंत पोचववी. कारण जी भाषा टिके, ती संस्कृती टिके… आनि जी संस्कृती टिके, तीच समाजनी खरी ओळख बनून राहे शे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button