
हृदयविकाराच्या रुग्णांसाठी मोठी बातमी: डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात मुंबईचे तज्ज्ञ डॉ. अदनान अली दाखल
३ हजारांहून अधिक एन्जीओग्राफीचा अनुभव; जळगावात आता अवघड शस्त्रक्रिया होणार सुकर
जळगाव: हृदयविकाराच्या जटील शस्त्रक्रियांसाठी आता जळगावकरांना मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरात धाव घेण्याची गरज उरणार नाही. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अदनान अली यांची २४ तास सेवा सुरू झाली आहे.
अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यात डॉ. अदनान अली यांचा हातखंडा आहे.
डॉ. अदनान यांनी मुंबईतील केईएम आणि नायर सारख्या प्रतिष्ठित रुग्णालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच सायन आणि शताब्दी रुग्णालयात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी व सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या नावावर ७५० हून अधिक यशस्वी एन्जीओप्लास्टी आणि ७० हून अधिक पेसमेकर शस्त्रक्रियांची नोंद आहे.
आता त्यांची ही तज्ज्ञ सेवा जळगावातील रुग्णांसाठी २४ तास उपलब्ध राहणार असून, बाह्यरुग्ण विभागात (OPD) सकाळी १० ते दुपारी ५ या वेळेत रुग्णांची तपासणी केली जाईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.





