Politics

आमदारकीची राजूमामांनी केली हॅट्रिक!

माजी महापौर जयश्री महाजन यांचा पराभव

गुलालाची उधळण करीत डीजेच्या तालावर कार्यकर्ते थिरकले !; जळगाव शहरात विजयाचा जल्लोष !

जळगाव:-जळगाव शहर मतदार संघात तिसऱ्यांदा उमेदवारीच्या रिंगणात उतरलेले आमदार राजू मामा भोळे यांनी माजी महापौर जयश्रीताई महाजन यांचा मोठ्या फरकाने पराभव करून विजयाची हॅट्रिक केली असून त्यांना भाजपचे निष्ठेचे फळ म्हणून मंत्री पदाची संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. जळगावकरांचे मामा अशी ओळख असलेले राजू मामा भोळे हे तिसऱ्यांदा भाजप च्या तिकिटावर जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून उभे राहिले होते.

त्यांना खरे आव्हान माजी महापौर जयश्रीताई महाजन यांचे तगडे आव्हान होते. तसेच माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे, आणि उबाठा गटाचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या बंडखोरीचे आव्हानही आमदार राजू मामा भोळे यांना होते. मात्र गतकाळात आमदार राजू मामा भोळे यांनी केलेली विकास कामे व विकासासाठी आणलेला मोठा निधी, तसेच लाडकी बहीण योजना यामुळेही आमदार राजू मामा भोळे यांना फायदा झाल्याचे बोलले जात आहे. रात्री अपरात्री मदतीला धावून जाणारा आमदार म्हणून राजू मामा भोळे यांची ओळख आहे.

महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होईल असेच चित्र आज होत असलेल्या निकालामुळे दिसून येत आहे. महायुती सरकार मध्ये भाजप हा मोठा पक्ष ठरणार आहे. आमदार राजू मामा भोळे यांना आता सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी असून मंत्री झाल्यानंतर जळगावचा विकास हा आणखी वेगाने होऊ शकतो असे बोलले जात आहे. दरम्यान राजू मामा भोळे यांनी अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि जळगावकरांचे असणारे प्रेम यामुळेच विजय मिळाल्याचे मनोगत व्यक्त केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button