गणित ऑलिम्पियाडमध्ये आरुषी सोमवंशी राज्यात सहावी

गणित ऑलिम्पियाडमध्ये आरुषी सोमवंशी राज्यात सहावी
भडगाव (प्रतिनिधी) येथील आदर्श इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या आरुषी स्वप्नील सोमवंशी हिने कु. गणित ऑलिम्पियाड परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात सहावा क्रमांक पटकावून आपल्या गावाचे व शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. बाळद. ता. पाचोरा. जि. जळगाव येथील रहिवासी असलेल्या आरुषीने वयाच्या अवघ्या आठ-नऊ वर्षांत हे असामान्य यश संपादन केले आहे. संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. राज्यस्तरीय सहावा क्रमांक मिळवणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. आरुषीच्या यागणितऑलिम्पियाड परीक्षेत हजारो विद्यार्थ्यांमधून यशामागे तिची जिद्द, मेहनत तसेच पालक व शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा मोलाचा वाटा आहे. आरुषीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आदर्श इंग्लिश मेडियम स्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक तसेच गावकऱ्यांनी तसेच वाघळी येथील माध्यमिक विदयालयातील कर्मचारी रवि देशमुख यांनीही तिचे हार्दिक अभिनंदन केले आहे. आरुषीने भविष्यातही असेच उज्वल यश मिळवावे अशा शुभेच्छा सर्वांनी दिल्या आहेत.





