
महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुश्रीराम अयोध्या मंडळ क्र. ४ कडून वृक्षारोपण
शिंधी कॉलनी परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश; भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर सौ. दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप प्रभुश्रीराम अयोध्या मंडळ क्र. ४ यांच्या वतीने शिंधी कॉलनी परिसरातील रस्त्याच्या दुभाजकावर वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमाला भाजप जळगाव महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक प्रकाश बालाणी, नगरसेवक ऋतिक ढेकळे, मंडळ अध्यक्ष विनोद मराठे, माजी मंडळ अध्यक्ष पिंटूभाऊ काळे, प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर, ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक कोष्टी, मालवाहतूक रिक्षा स्टॉपचे धनराज बागुल, विजय लाडवंजारी, संदीप खरे, संतोष मिस्त्री, चंदू नाथ, राजेश जोशी तसेच परिसरातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. उपस्थितांनी महापौर दीपमाला काळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्याचा संदेश दिला.






