Crime

मुक्ताईनगरात एलसीबीची धडक कारवाई; १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, कार व मोबाईल जप्त

मुक्ताईनगरात एलसीबीची धडक कारवाई; १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, कार व मोबाईल जप्त

जळगाव | प्रतिनिधी

जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मुक्ताईनगर परिसरात धडक कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, एक चारचाकी वाहन आणि दोन मोबाईल फोन असा एकूण १२ लाख ६ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

गोपनीय माहितीवरून सापळा

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक गोपनीय माहिती संकलित करत होते. १७ जुलै रोजी मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-३० एझेड-४६६४ क्रमांकाच्या मारुती सुझुकी अर्टिगा कारमधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याचे समोर आले.

१२.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

त्यानुसार मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून वाहनाची तपासणी करण्यात आली. वाहनातून विविध कंपन्यांचा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आढळून आला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून ३ लाख ८६ हजार ९०८ रुपयांचा गुटखा, ८ लाख रुपयांची मारुती सुझुकी अर्टिगा कार आणि २० हजार रुपयांचे दोन विवो कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण १२ लाख ६ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पुढील तपास सुरू

या कारवाईनंतर दोन संशयितांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस करत आहेत.

पथकाची कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस नाईक हेमंत पाटील व पोलीस कॉन्स्टेबल रतन गिते यांच्या पथकाने केली.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री व वाहतुकीविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगत नागरिकांनी अशा अवैध प्रकारांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button