Detection

जळगावात तरुणाचा निर्घृण खून; चार संशयितांना एलसीबीकडून अटक, दोन अल्पवयीन, एक फरार

महा पोलीस न्यूज । दि.४ मे २०२५ । शहरातील अशोक नगर परिसरातील आकाश भावसार या ३० वर्षीय तरुणाचा राष्ट्रीय महामार्गावरील ए वन भरीत सेंटरजवळ शनिवारी रात्री धारदार शस्त्रांनी वार करून क्रूरपणे खून करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या २४ तासांत चार संशयितांना अटक केली असून दोन अल्पवयीन आहेत. एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मोहीम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव आकाश पंडित भावसार (वय २७, रा. अशोक नगर, जळगाव) असे आहे. आकाश यांची आई कोकिळाबाई भावसार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शनिपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीत अजय मंगेश मोरे (वय २८, रा. कासमवाडी, जळगाव) याच्यासह चार अज्ञात व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला असता काही संशयित मित्रांकडे, तर काही नातेवाइकांकडे लपून बसले होते.

एलसीबीच्या पथकाने अजय मंगेश मोरे वय-२८, चेतन सोनार वय-२३ रा.कासमवाडी याच्यासह दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. कुणाल उर्फ सोनू चौधरी हा संशयित फरार आहे, आणि त्याला पकडण्यासाठी पोलिसांची शोधमोहीम तीव्र झाली आहे. याप्रकरणी पुढील तपास शनिपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक साजीद मन्सुरी करीत आहेत. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात सातत्याने घडणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button