Social
जैन उद्योग समूहातर्फे शहर पोलीस स्टेशनमधील कैद्यांसाठी सतरंजी, चादर सुपूर्द
माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांचा पुढाकार

महा पोलीस न्यूज | १७ एप्रिल २०२४ | आज राम नवमीच्या निमित्ताने जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या लॉकअपमधील कैद्यांना अंथरण्यासाठी सतरंजी व पांघरूण म्हणून सोलापुरी चादर देण्यात आल्या.
प्रसंगी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार पी. गुप्ता, जैन इरिगेशनचे चंद्रकांत जैन, अनिल जोशी यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना या वस्तू सुपूर्द करण्यात आल्यात. लॉकअपमधील कैद्यांना या वस्तू मिळण्यासाठी सहकार्य व्हावे अशी अपेक्षा दीपककुमार गुप्ता यांनी जैन उद्योग समूहाचे अशोक जैन यांच्याकडे केली होती, त्यानुसार सदरच्या वस्तू आज संबंधित पोलीस स्टेशनला सुपूर्द करण्यात आल्या.