CrimeEducationHealthPoliticsSport

भडगावच्या मानसी, मुक्ताई आणि श्रद्धाची रोलर स्केटिंगमध्ये भरारी

नाशिक विभागीय स्पर्धेत चमकल्या; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिघींची निवड

भडगावच्या मानसी, मुक्ताई आणि श्रद्धाची रोलर स्केटिंगमध्ये भरारी

नाशिक विभागीय स्पर्धेत चमकल्या; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिघींची निवड

भडगाव, प्रतिनिधी : रोलर स्केटिंगच्या नाशिक विभागीय स्पर्धेत भडगावच्या तीन खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले आहे. कु. श्रद्धा बापूराव पाटील हिने १७ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक, तर कु. मुक्ताई वैभव सोलाट आणि कु. मानसी निलेश ब्राह्मणकर यांनी ११ वर्षे वयोगटात तृतीय क्रमांक मिळविला. या यशाच्या जोरावर तिघींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय रोलर स्केटिंग स्पर्धा २०२६ मध्ये या खेळाडूंनी आपले कौशल्य सिद्ध केले. त्यांच्या यशामुळे भडगावच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

मुक्ताई ही भडगावच्या तहसीलदार शीतल सोलाट यांची कन्या आहे, तर मानसी ही भडगाव पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल निलेश ब्राह्मणकर यांची कन्या आहे. लहान वयातच जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर त्यांनी हे यश मिळविले आहे.

या तिन्ही खेळाडूंना अतिक साटोटे, सुनील मोरे तसेच गजानन स्पोर्ट्स अकॅडमी, पाचोरा व भडगाव यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, नियमित सराव आणि खेळाडूंच्या मेहनतीमुळे त्यांना विभागीय स्तरावर यश मिळविता आले.

श्रद्धा, मानसी आणि मुक्ताई यांच्या यशाबद्दल त्यांचे कुटुंबीय, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी आणि परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन होत आहे. आता राज्यस्तरीय स्पर्धेतही तिघींनी उत्कृष्ट कामगिरी करून भडगावचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button