OtherSocial

विनय गोसावी यांना पदोन्नती; धुळे अपर जिल्हाधिकारी म्हणून पदस्थापना

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने निवडसूची वर्ष २०२५-२०२६ (अतिरिक्त निवडसूची) अंतर्गत निवडश्रेणी उपजिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत विनय यशवंत गोसावी यांना अपर जिल्हाधिकारी (गट-अ) पदावर पदोन्नती देण्यात आली असून त्यांची धुळे जिल्ह्यातील रिक्त अपर जिल्हाधिकारी पदावर पदस्थापना करण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापना मंडळ क्र.२ च्या शिफारशीनुसार व महसूल संवर्ग वाटप नियमावलीतील संबंधित तरतुदींनुसार ही पदोन्नती देण्यात आली आहे. विनय गोसावी यांनी सोमवारी आपला पदभार स्वीकारला आहे.

धुळे जिल्ह्यात अपर जिल्हाधिकारी म्हणून ते जिल्हाधिकारी कार्यालयातील महत्त्वाची जबाबदारी सांभाळणार आहेत. सध्या धुळे जिल्ह्यात श्रीमती भाग्यश्री विसपुते (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ही पदोन्नती महसूल विभागातील निवडश्रेणी अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. गोसावी यांनी नव्या जबाबदारीत धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी व प्रशासकीय कार्यक्षमतेसाठी योगदान देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पूर्वीची सेवा व अनुभव
विनय गोसावी यांनी महसूल प्रशासनात दीर्घ अनुभव घेतला आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विभागाचे प्रांताधिकारी (उपविभागीय अधिकारी) म्हणून त्यांनी सुमारे तीन वर्षे कार्यभार सांभाळला. या काळात त्यांनी महसूल प्रशासन, गौण खनिज वाहतूक तपासणी, कायदा व सुव्यवस्था, निवडणूक संबंधी कामकाज आणि नागरिकभिमुख उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. २०२१ मध्ये लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी अचानक तपासणी मोहीम राबविली होती.

ऑगस्ट २०२४ मध्ये जळगाव येथील प्रांताधिकारीपदी त्यांची नियुक्ती झाली. यापूर्वी ते मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित कामकाजात सहभागी होते. जळगाव जिल्ह्याची चांगली ओळख असल्याने स्थानिक प्रशासकीय आव्हाने हाताळण्यात त्यांचा अनुभव उपयुक्त ठरला.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button