Other

चारा टंचाईवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : डॉ. प्रदीप झोड

हिवरखेडा येथे चारा साक्षरता व संवर्धन अभियान उत्साहात

चारा टंचाईवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : डॉ. प्रदीप झोड

हिवरखेडा येथे चारा साक्षरता व संवर्धन अभियान उत्साहात

जळगाव, : यंदा जिल्ह्यातील काही भागांत पर्जन्यमानात घट झाल्याने खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. आगामी काळात हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, टंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी पशुपालकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चारा उत्पादन वाढवावे आणि उपलब्ध चाऱ्याचे योग्य संवर्धन करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी केले.

जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि जामनेर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हिवरखेडा येथे आयोजित चारा साक्षरता व संवर्धन अभियानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे. के. चव्हाण होते.

कार्यक्रमाची सुरुवात गोपूजनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते अझोला रोपण करण्यात आले. तसेच कृष्णप्रिया गोशाळेच्या चारा गोदामाचे उद्घाटन आणि गोशाळेने तयार केलेल्या गोखरू व सेंद्रिय कंपोस्ट खताचे अनावरण करण्यात आले.

*चारा संवर्धनाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक*

पशुपालकांना निकृष्ट चारा सकस करण्यासाठी युरिया प्रक्रिया कशी करावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. श्रीकांत व्यवहारे यांनी सादर केले. याशिवाय हायड्रोपोनिक पद्धतीने चारा निर्मिती, अझोला उत्पादन, मुरघास तयार करण्याच्या विविध पद्धती तसेच मुक्त गोठ्याच्या प्रतिकृतीची रचना यांची माहिती प्रात्यक्षिकांसह देण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून पशुपालन अधिक फायदेशीर करण्याच्या दृष्टीने या उपक्रमातून पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. स्वप्नजा लोखंडे यांनी केले. त्यांनी चारा साक्षरता व संवर्धन अभियानाची उद्दिष्टे स्पष्ट करताना पशुपालकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन केले. तसेच तालुक्यातील पशुपालकांनी चारा बियाण्यांची मागणी नोंदवावी, असेही त्यांनी सांगितले.

जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी पशुपालकांनी स्वतः चारा पिकांची लागवड करून उपलब्ध चाऱ्याची बचत व योग्य नियोजन करण्याचे आवाहन केले. अमर पाटील, माजी पंचायत समिती सदस्य यांनी पाणी व्यवस्थापन आणि पाणी बचतीचे महत्त्व विशद केले. सहाय्यक गट विकास अधिकारी कैलास काळे यांनी विकसित भारत रोजगार व आजीविका योजनेची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आभार डॉ. अमोल वराडे (गोंडखेल) यांनी मानले, तर सूत्रसंचालन डॉ. संदीप पाटील, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, नाचणखेडा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. अमोल वराडे आणि श्रीकृष्णप्रिया गोशाळेचे संचालक दीपक पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button