Politics

‘Friends of MY Bharat’द्वारे जगभरातील भारतीय युवकांना भारताच्या विकासप्रवासाशी जोडणार

BRICS Youth Summit 2026 मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उपक्रमाची घोषणा

‘Friends of MY Bharat’द्वारे जगभरातील भारतीय युवकांना भारताच्या विकासप्रवासाशी जोडणार
BRICS Youth Summit 2026 मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उपक्रमाची घोषणा

गांधीनगर |  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला जागतिक युवा जोडणीची नवी दिशा देण्यासाठी ‘Friends of MY Bharat’ हे विशेष डिजिटल मॉड्यूल सुरू करण्यात येणार आहे. युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या MY Bharat व्यासपीठाच्या माध्यमातून जगभरातील भारतीय वंशाच्या युवकांना भारताच्या विकासप्रवासाशी जोडण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी गांधीनगर येथे आयोजित BRICS Youth Summit 2026 दरम्यान या उपक्रमाची घोषणा केली. भारताबाहेर शिक्षण घेणारे विद्यार्थी, युवा व्यावसायिक तसेच विविध समुदायांशी जोडलेले भारतीय वंशाचे युवक या माध्यमातून MY Bharat शी जोडले जाऊ शकणार आहेत.

राष्ट्रनिर्मितीत युवकांचा सहभाग

BRICS Youth Summit मध्ये मार्गदर्शन करताना रक्षा खडसे यांनी युवकांनी जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार राहण्याची गरज व्यक्त केली. नेतृत्व, समाजसेवा आणि राष्ट्रनिर्मितीसाठी युवकांना योग्य संधी व व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

BRICS आणि भागीदार देशांतील युवा नेत्यांशी संवाद साधताना विविध अनुभव व दृष्टिकोनातून शिकण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. आपल्या समुदायांशी आणि मूल्यांशी जोडलेले राहून परस्परांकडून शिकण्याची भावना युवा नेतृत्व अधिक सक्षम करते, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, खासदार डॉ. हेमांग जोशी, युवा कार्य विभागाचे अतिरिक्त सचिव नितेश कुमार मिश्रा यांच्यासह BRICS आणि भागीदार देशांतील युवा नेते उपस्थित होते.

जगभरातील भारतीय युवकांना स्वयंसेवेची संधी

‘Friends of MY Bharat’ मॉड्यूलच्या माध्यमातून जगभरातील भारतीय युवकांना ‘Friend of MY Bharat’ म्हणून नोंदणी करता येणार आहे. त्यांना आपल्या Youth Club किंवा Association ची माहिती, संबंधित उपक्रम आणि कार्यक्षेत्राची माहिती नोंदविता येईल.

शिक्षण, पर्यावरण संवर्धन, आरोग्य जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन आणि सांस्कृतिक वारसा संवर्धन अशा विविध क्षेत्रांमध्ये स्वयंसेवेच्या संधीही या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Know Your India’मधून भारताची ओळख

या डिजिटल मॉड्यूलमध्ये ‘Know Your India’ हा विशेष विभागही असणार आहे. याद्वारे जगभरातील भारतीय युवकांना भारताची संस्कृती, इतिहास, वारसा, पर्यटन, भारतभेटीशी संबंधित माहिती तसेच देशाच्या विकासाला आकार देणाऱ्या प्रमुख व्यक्तिमत्त्वांची माहिती मिळणार आहे.

याशिवाय MY Bharat चे राष्ट्रीय महत्त्वाचे उपक्रम व कार्यक्रमही या माध्यमातून प्रदर्शित केले जाणार आहेत. त्यामुळे भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या युवकांमध्ये देशाच्या युवा-केंद्रित विकासप्रवासाबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे.

‘युवकांना योग्य संधी दिल्यास ते भारताच्या उज्ज्वल भविष्याचा मजबूत पाया घडवू शकतात’

रक्षा खडसे म्हणाल्या, “भविष्यातील नेतृत्व त्यांचे असेल जे जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार आहेत. युवकांना नेतृत्व करण्यासाठी, आपल्या समुदायांची सेवा करण्यासाठी आणि राष्ट्रनिर्मितीत अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी योग्य संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. युवकांना योग्य दिशा आणि संधी दिल्यास ते भारताच्या उज्ज्वल भविष्याचा मजबूत पाया घडवू शकतात.”

MY Bharat म्हणजे काय?

‘मेरा युवा भारत’ (MY Bharat) हे युवा कार्य विभाग, युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाचे राष्ट्रीय युवा व्यासपीठ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी त्याचा शुभारंभ करण्यात आला. सेवा, कर्तव्य आणि जनभागीदारी या मूल्यांवर आधारित MY Bharat युवकांना अनुभवाधारित शिक्षण, स्वयंसेवा, कौशल्य विकास, नेतृत्व, मार्गदर्शन आणि राष्ट्रीय मोहिमांशी जोडते.

विकसित भारत @२०४७च्या निर्मितीत युवकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने ‘Friends of MY Bharat’ हा उपक्रम भारताबाहेरील भारतीय युवकांसाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

 

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button