जीवन कला मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन

जीवन कला मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन
११ ते २० ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम; श्रीसूक्ताच्या १६ आवर्तन पूजेचे आयोजन
जळगाव, प्रतिनिधी : जयनगर येथील जीवन कला मंदिरात श्री शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन ११ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. पूर्णवादी नारी फोरम, पूर्णकन्या प्रतिष्ठान आणि कला संगम भगिनी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
रविवार, ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापना व नवरात्रारंभाने महोत्सवाची सुरुवात होणार असून, यावेळी श्रीसूक्ताच्या १६ आवर्तन पूजेला प्रारंभ होईल. नवरात्रोत्सवाच्या काळात विविध धार्मिक पूजा-अर्चा, विशेष उपासना तसेच महाष्टमी, महानवमी आणि विजयादशमीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी ललितापंचमी, रविवार, १८ ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी व महाष्टमीनिमित्त विशेष पूजा, तर सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी महानवमीनिमित्त विशेष पूजा होणार आहे. मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या कार्यक्रमाने नवरात्र महोत्सवाची सांगता होईल.
श्रीसूक्ताच्या १६ आवर्तन पूजेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गुरुबंधू-भगिनींनी आपले नाव व गोत्र नोंदवावे. पूजेसाठी दररोज दुपारी ३ वाजता उपस्थित राहावे. नावनोंदणीसाठी प्रीती चौधरी व अदिती कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
जळगाव परिसरातील गुरुबंधू-भगिनींसह जयनगरवासीयांनी या नवरात्र महोत्सवात सहभागी होऊन माता भगवतीची उपासना करावी आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ : जीवन कला मंदिर, जयनगर, जळगाव
आयोजक :
पूर्णवादी नारी फोरम
पूर्णकन्या प्रतिष्ठान
कला संगम भगिनी, जळगाव
॥ जय पूर्णवाद ॥







