अमळनेरच्या पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

अमळनेरच्या पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
मुंदडा नगरातील नागरिकांशी साधला संवाद; मदत व बचावकार्य गतिमान करण्याचे निर्देश
अमळनेर | प्रतिनिधी
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अमळनेर शहरातील मुंदडा नगर परिसरातील पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व तातडीच्या गरजा जाणून घेतल्या.
पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचे तसेच बचाव व पुनर्वसनाची कार्यवाही वेगाने आणि समन्वयाने राबविण्याचे निर्देश दिले.
पूरपरिस्थितीमुळे प्रभावित कुटुंबांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी, अमळनेर तसेच तहसीलदार, अमळनेर उपस्थित होते. त्यांनीही परिसरातील परिस्थितीची माहिती देत सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांना दिला.






