Crime

मुक्ताईनगरात आढळल्या पाचशेच्या बनावट नोटा;गुन्हा दाखल

मुक्ताईनगरात आढळल्या पाचशेच्या बनावट नोटा;गुन्हा दाखल

सुभाष धाडे, मुक्ताईनगर l मुक्ताईनगर शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत व्यापाऱ्याच्या भरण्यात पाचशे रुपयांच्या काही बनावट नोटा आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात सोमवारी रात्री मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात बँक व्यवस्थापक यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, शहरातील बोदवड रोडवरील स्टेट बैंक ऑफ इंडिया बैंक शाखेत वीटभट्टी व्यावसायिक दुपारी दोन वाजेच्या सुमारास १ लाख २० हजार रुपये भरणा करण्यासाठी आले असता, त्या व्यापाऱ्याच्या भरण्यात पाचशे रुपयांच्या

सात नोटा असे एकूण ३५०० रुपये हे भरणा करताना मशीन तपासणीत बनावट आढळले. रोखपालाने ही बाब तत्काळ स्टेट बँक व्यवस्थापकास सांगितली. त्यानंतर त्यांनी संबंधित व्यापाऱ्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे ते दुसऱ्याकडून आले असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मुक्ताईनगर शाखा स्टेट बँकेचे व्यवस्थापक कार्तिक दहीकर यांनी मुक्ताईनगरचे पोलिस निरीक्षक नागेश मोहीते यांना कळविली.दरम्यान पोलिसांकडुन कसून तपासणी करण्यात येत आहे.

पोलिस अधिकारी व फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी तसेच दोन शासकीय पंच यांच्या पथकाने बँकेमध्ये पाहणी केली.

याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनमध्ये बनावट नोटा ताब्यात बाळगणे व वापरात आणण्याचा प्रयत्न करणे यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र चाटे करीत असल्याचं समजते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button