Politics

मुख्यमंत्री महोदय, तो बैल तर आजारी निघाला

शासनाने गरीब वृद्ध शेतकऱ्यांची फसवणूक करायला नको होती

मुख्यमंत्री महोदय, तो बैल तर आजारी निघाला

शासनाने गरीब वृद्ध शेतकऱ्यांची फसवणूक करायला नको होती

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली खंत

जळगाव:- सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वृद्ध शेतकरी दाम्पत्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैल पाठवला होता मात्र हा बैल आजारी निघाला असून त्याच्या आजाराचा खर्च त्याच वृद्ध शेतकरी दाम्पत्यावर येऊन पडला आहे. शासनाने गरीब वृद्ध शेतकऱ्यांची फसवणूक करायला नको होती अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली आहे.

रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यात त्या म्हणाल्या की, गरीब शेतकरी दाम्पत्याचे दुःख पाहून संपूर्ण महाराष्ट्राने हळहळ व्यक्त केली होती. शासनानेही पाझर फुटल्याचा दिखावा केला. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी दांपत्याला प्रशासनामार्फत दुसरा बैल उपलब्ध करून दिला होता. याचा मोठा गाजावाजा करण्यात आला. बातम्या काय चालवल्या, सोशल मीडियावर व्हिडिओ काय बनवले. मात्र शासनाने दिलेला बैल आजारी निघालाय आणि आता त्या गरीब शेतकऱ्यांवर त्या बैलाच्या आजाराचा खर्च पडला आहे. फसवणूक करण्यात महायुती सरकारचा हातखंडा आहे याची कल्पना राज्याला आहे मात्र त्या गरीब शेतकऱ्यांची तरी शासनाने फसवणूक करायला नको होती..

*तुकोबांच्या अभंगातून सुनावलं*

देता देता हात, नको धरूसी मागे ।
अर्ध्या मनाचे दान, फळ न लागे पुढे ॥

https://x.com/i/status/2065314952798408878

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button