Social

१३ वर्षांनंतर दुर्मिळ योग; भडगावात शनैश्वर महाराज यात्रोत्सव

१३ वर्षांनंतर दुर्मिळ योग; भडगावात शनैश्वर महाराज यात्रोत्सव

शनी जयंती आणि शनी अमावस्येचा एकत्रित योग; कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन

भडगाव प्रतिनिधी : येथील शनि मंदिर परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री शनैश्वर महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शनिवार, दि. १६ मे २०२६ रोजी यात्रोत्सवाला प्रारंभ होणार असून, यावर्षी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे.

यात्रोत्सवानिमित्त सोमवार, दि. १८ मे २०२६ तसेच बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी रात्री ८ वाजता जाहीर कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारच्या दिवशी भागवताचार्य ह.भ.प. धनश्रीताई शिंदे (भडगाव) यांचे कीर्तन होणार असून, बुधवारच्या दिवशी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. कबीर अतार महाराज (कोल्हापूर) यांचे कीर्तन संपन्न होणार आहे.

यंदाच्या यात्रोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे याच दिवशी श्री शनी जयंती आणि शनी अमावस्या असा दुर्मिळ योग जुळून आला आहे. तब्बल १३ वर्षांनंतर हा योग आल्याने धार्मिकदृष्ट्या या यात्रोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

भाविकांनी यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा तसेच कीर्तन कार्यक्रमांना उपस्थित राहून धार्मिक वातावरणाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री शनैश्वर पंच मंडळ, भडगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button