चोपडा तालुक्यात गोमांसाची वाहतूक करणारे वाहन पकडले ; ७७७ किलो गोमांससह चार लाखांचा मुद्देमाल जप्त

चोपडा तालुक्यात गोमांसाची वाहतूक करणारे वाहन पकडले ; ७७७ किलो गोमांससह चार लाखांचा मुद्देमाल जप्त
चोपडा l प्रतिनिधी
एका चार चाकी वाहनातून गोमास च वाहतूक होत असल्याची खबर मिळाल्यावरून वाहनाचा पाठलाग करणाऱ्या गोरक्षकांना चकविण्यासाठी वाहन चालकाने वाहन एका केळीच्या शेतात उतरवले आणि तेथून तो पसार झाला . मात्र वाहनात ७७७ किलो वजनाचे गोमांस आणि वाहन असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही घटना आज आठ जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास चोपडा तालुक्यातील माचला ते वड्री दरम्यान घडली. याप्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राणींन फाउंडेशन नेहा दीदी पटेल या संस्थेच्या गोरक्षकांना अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्गावर चारचाकी वाहनात गोवंशाचे मांस घेऊन जात असल्याची खबर दिली. त्यांनी सदर वाहनाच्या पाठलाग सुरू केला. माचला ते वर्डी फाट्याच्या दरम्यान एका फार्महाऊस समोरील महामार्गाच्या खाली केळीच्या शेतात गोमांस असलेले वाहन क्रमांक एम एच ४३ बी बी ०४०९ सुमारे दहा फूट खोल खड्ड्यात उतरवून या वाहनाचा चालक वाहन तेथेच ठेवून पसार झाला. सदर गोरक्षकांनी अडावद पोलिसांना फोन करून माहिती दिली. अडावद पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, हवालदार विनोद धनगर, संजय धनगर, अन्वर तडवी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करीत पुढील कारवाई सुरू केली.
उशीरपर्यंत अडावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.