जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील संभाव्य पालकमंत्र्यांची यादी आली समोर!; पालकमंत्र्यांच्या नावाची उत्सुकता कायम

मुंबई जळगाव :- राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदी कोण आणि मंत्रिमंडळ विस्तार अशा अनेक बाबी महायुती सरकारमध्ये रखडल्या होत्या. यानंतर मंत्रीपदा ची शपथ आणि खातेवाटप जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री कोण यावर सध्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असून जवळपास महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी 80 टक्के ठिकाणी पालकमंत्री पदावर शिक्का मोर्तब केले असले तरी काही ठिकाणी पालकमंत्री पदासाठी महायुतीच्या आमदारांनी दावा केला आहे.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पदी कोण होणार याची उत्सुकता जळगाव जिल्हा वाशी यांना लागून असले तरी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचे नाव पुढे येत असून भाजपचे जेष्ठ नेते गिरीश महाजन यांनी सुद्धा जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर दावा केला आहे. तसेच लातूर आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद गिरीश महाजन यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र शिवसेनेचे दादा भुसे यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा केला असल्याचे बोलले जात आहे. मात्र एकीकडे पालकमंत्री पदाचा तिढा सुटला असल्याची चर्चा झाली असून माध्यमांमधून संभाव्य पालकमंत्र्यांच्या नावांची यादी समोर आली आहे. काही जिल्ह्यांचे पालकमंत्री पदाच्या जागेबाबत संभ्रमावस्था दिसून येत आहे.
पालकमंत्रिपदाची संभाव्य यादी
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे – एकनाथ शिंदे
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
सांगली – शंभूराज देसाई
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट / अतुल सावे
जळगाव – गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे
यवतमाळ – संजय राठोड
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
अकोला – माणिकराव कोकाटे/ आकाश फुंडकर यांचाही दावा आहे.
अमरावती – चंद्रकांत पाटील
भंडारा – राष्ट्रवादी
बुलढाणा – आकाश फुंडकर
चंद्रपूर – नरहरी झिरवळ
धाराशीव – धनंजय मुंडे
धुळे – जयकुमार रावल
गडचिरोली – भाजप
गोंदिया – आदिती तटकरे
हिंगोली – आशिष जैस्वाल
लातूर – गिरीष महाजन
मुंबई शहर – प्रताप सरनाईक
मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा
नांदेड – आशिष शेलार
नंदुरबार – अशोक ऊईके
नाशिक – दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा
पालघर – गणेश नाईक
परभणी – मेघना बोर्डीकर
रायगड – भरत गोगावले / आदिती तटकरे यांचाही दावा कायम
सिंधुदुर्ग- नितेश राणे
रत्नागिरी – उदय सामंत
सोलापूर – जयकुमार गोरे
वर्धा – पंकज भोयर
वाशिम – दत्तात्रय भरणे
जालना – अतुल सावे
लातूर – बाळासाहेब पाटील