Other

श्री मंगळग्रह मंदिरात विधिवत घटस्थापना

श्री मंगळग्रह मंदिरात विधिवत घटस्थापना

आजपासून श्रीयंत्र व भौमयंत्रावर अर्चन; १९ ऑक्टोबरला नवचंडी यज्ञ

अमळनेर : आश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात मंगळ होरा या शुभ मुहूर्तावर रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी श्री मंगळग्रह मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त त्रिशुलात्मक भगवान श्री कालभैरव व माता श्री भैरवी यांच्या मंदिरासमोर विधिवत पूजाअर्चा करून घटस्थापना करण्यात आली. यावेळी अतिजागृत भूमिमातेच्या मूर्तीवर सहस्र पुष्पार्चनही करण्यात आले.
घटस्थापनेचे यजमान शुभम वैष्णव गुरुजी सपत्नीक उपस्थित होते. मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी, यश जोशी व तुषार दीक्षित यांनी पौरोहित्य केले. चंद्रकांत जोशी यांनी ढोलकीवर साथ दिली, तर उमेश पाठक यांनी सहकार्य केले. भूमिमातेच्या मूर्तीवर पुरोहित जयेंद्र वैद्य यांनी सहस्र पुष्पार्चन केले. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

दररोज अर्चन व सामूहिक आरती

सोमवार, दि. १२ ते रविवार, दि. १८ ऑक्टोबरदरम्यान दररोज सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत विशेष यजमानांच्या हस्ते श्रीयंत्र व भौमयंत्रावर अर्चन करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ६.३० वाजता शहरातील महिला मंडळांच्या वतीने सामूहिक आरती होईल.

१९ ऑक्टोबरला नवचंडी यज्ञ

सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी नवचंडी यज्ञाचे दोन सत्रांत आयोजन करण्यात आले आहे. पहिले सत्र सकाळी ९ ते दुपारी १२, तर दुसरे सत्र दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. सायंकाळी यज्ञाची पूर्णाहुती होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button