Social

रावेर मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवरील SIR-2026 मॅपिंगच्या चौकशीची मागणी

रावेर मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवरील SIR-2026 मॅपिंगच्या चौकशीची मागणी
संशयास्पदरीत्या जास्त पडताळणीच्या प्रमाणावरून स्वतंत्र व निष्पक्ष चौकशीची मागणी

रावेर | प्रतिनिधी : रावेर विधानसभा मतदारसंघातील SIR-2026 (Special Intensive Revision) प्रक्रियेदरम्यान काही मतदान केंद्रांमध्ये मतदार मॅपिंग व पडताळणीचे प्रमाण संशयास्पदरीत्या जास्त असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी रावेर-यावल विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा बीएलए-1 विलास चौधरी यांनी केली आहे.

यासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य तसेच भारत निवडणूक आयोगाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रावेर व यावल तालुक्यातील काही मतदान केंद्रांवर मतदार मॅपिंग व पडताळणीचे काम अत्यंत मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाल्याचे दर्शविण्यात आले आहे. काही विशिष्ट मतदान केंद्रांवरील मॅपिंग व पडताळणीचे प्रमाण इतर केंद्रांच्या तुलनेत असामान्यरीत्या जास्त असल्याचे निदर्शनास येत असून त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सदर प्रक्रियेत समान निकष, एकसमान कार्यपद्धती आणि निष्पक्षता पाळण्यात आली का, याबाबत गंभीर शंका उपस्थित होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित मतदान केंद्रांवरील मॅपिंग व पडताळणी प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, वापरण्यात आलेल्या निकषांची पडताळणी करावी तसेच प्रत्यक्ष नोंदविण्यात आलेल्या माहितीची सत्यता तपासण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच आवश्यक असल्यास संपूर्ण प्रक्रियेची पुनर्पडताळणी (Re-verification) करण्यात यावी, अशीही मागणी विलास चौधरी यांनी केली आहे.

दरम्यान, या निवेदनामुळे रावेर विधानसभा मतदारसंघातील SIR-2026 प्रक्रियेबाबत राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून निवडणूक प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.b

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button