Crime

ब्रेकिंग : जळगावातील हॉटेलमध्ये फायरींग, घटना सीसीटीव्हीत कैद

महा पोलीस न्यूज । दि.२७ ऑगस्ट २०२४ । जळगाव शहरातील भास्कर मार्केट परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये टेबलावर बसलेल्या एका गटातील तरुणाने गोळीबार केल्याची घटना आज दि.२७ रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास घडली. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील भास्कर मार्केट परिसरात असलेल्या एका बियर बारमध्ये काही तरुण मंगळवारी मद्यप्राशन करीत बसले होते. ७ वाजेच्या सुमारास एका तरुणाने टेबलाच्या खाली १ राउंड फायर केला. गोळीबार नंतर लागलीच सर्वांनी काढता पाय घेतला.

घडलेली घटना हॉटेलमध्ये कुणालाच कळाली नाही. अंदाजे तीन तासांनी जिल्हापेठ पोलीस त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी चौकशीला सुरुवात केली. हॉटेलमध्ये रिकामा राऊंड सापडला असून घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, फायरिंग करणारा आणि इतरांची ओळख पटली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी भेट दिली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button