Social

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांचा उपक्रम; विजेत्या संघाला रोख पारितोषीके

जळगाव  प्रतिनिधी– भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी शिवतीर्थ मैदान येथे युवतींची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. दहिहंडी फोडणाऱ्या युवतींच्या प्रथम विजेत्या संघाला ३११११ रूपये, द्वितीय संघाला २११११ रूपये, तृतीय संघाला १११११ रूपये रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. युवतींच्या दहीहंडीचे यंदा १८ वे वर्ष असून दहिहंडी सारख्या मोठ्या उत्सवात पुरूषांप्रमाणे युवतींचा सहभाग वाढावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही दहींहंडी सुरू करण्यात आली आहे. मानवी मनोरे बनविणे या क्रीडा प्रकाराला महाराष्ट्र शासनातर्फे साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात ही एकमेव युवतींची दहीहंडी साजरी होत असते.
सदर दहीहंडी उत्सवाची समिती गठीत करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सीमा पाटील, उपाध्यक्षपदी उषा जैन, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, स्वागत समिती प्रमुख डॉ. कल्याणी नागूलकर व सचिवपदी प्रा. क्षमा सराफ यांची निवड करण्यात आली आहे.

सदर कार्यकारीणी पुढीलप्रमाणे – खजिनदार निलम जोशी, स्वागत समिती सदस्य रूपाली वाघ, सदस्य म्हणून डॉ. अनिता पाटील, हर्षाली चौधरी, नेहा जोशी, सोनाली पाटील, लेफ्टनंट डॉ. हेमाक्षी वानखेडे, संध्या कांकरिया, मिनल जैन यांची या असतील. युवतींची दहिहंडी उत्सव समितीच्या नविन कार्यकारिणीने ‘ठेवूया संस्कृतीची जाण, वाढवू आपल्या उत्सवाची शान’ या टॅगलाईन चे पोस्टर अनावरण केले.

*कोट..*

‘युवतींनी युवतींसाठी आयोजित केलेली दहिहंडी हा अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी उपक्रम आहे. महिलांनी पुढाकार घेऊन महिलांसाठी व्यासपीठ निर्माण करणे ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. त्यांच्या या उत्साहाला प्रोत्साहन देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. अशा उपक्रमामधून युवतींच्या आत्मविश्वाला बळ मिळते आणि समाजात महिला नेतृत्वाची नवी दिशा निर्माण होते.’
अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button