Other

खरीप हंगाम 2025-26 साठी खतांचा वेळेवर पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील बफर साठ्याची मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्याकडून पाहणी

 

खरीप हंगाम २०२5-26 साठी खतांचा वेळेवर पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील बफर साठ्याची मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्याकडून पाहणी

जळगाव | प्रतिनिधी  खरीप हंगाम 2025-26 दरम्यान शेतकऱ्यांना वेळेवर व पर्याप्त प्रमाणात खतांचा पुरवठा होण्यासाठी जळगाव जिल्ह्यात युरिया व डीएपी खतांचा बफर साठा उभारण्यात आलेला आहे. दिनांक 12 जून 2025 रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी या बफर साठ्याची प्रत्यक्ष पाहणी करून साठवणूक व वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला.

या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रणधीर सोमवंशी, कृषी विकास अधिकारी श्री पद्मनाभ म्हस्के तसेच महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ (MAIDC) चे विभागीय व्यवस्थापक श्री सुनिल इंगळे उपस्थित होते.

श्रीमती करनवाल यांनी साठवणूक केलेल्या युरिया व डीएपी खतांच्या पिशव्यांवरील माहिती, साठवणूक पद्धती, वितरण व्यवस्था, रेक पॉईंट व वाहतूक व्यवस्थेची सविस्तर माहिती घेतली. साठवणूक नियमानुसार सुरक्षित, स्वच्छ आणि योग्य प्रकारे ठेवण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांपर्यंत खताचा पुरवठा वेळेवर, पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीने होईल याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
शेतकऱ्यांच्या हितासाठी खत वितरणात कोणताही विलंब होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे, असेही श्रीमती करनवाल यांनी यावेळी नमूद केले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button