Social

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन महाविद्यालयात ‘गोदावरी कॅम्पसच्या राजा’चे भव्य आगमन !

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन महाविद्यालयात ‘गोदावरी कॅम्पसच्या राजा’चे भव्य आगमन !

जळगाव: डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (Dr. Varsha Patil Women’s College of Computer Application) येथे श्री गणेशोत्सवाचे औचित्य साधून ‘गोदावरी कॅम्पसचा राजा’ भव्य आगमन सोहळा व श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अत्यंत उत्साहात पार पडली. डॉ. प्रशांत वारके आणि डॉ. निलीमा वारके यांच्या शुभहस्ते श्री गणेशमूर्तीची विधीवत पूजा-अर्चा व प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

गणेशोत्सवानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी अत्यंत कल्पक, भव्य आणि आकर्षक अशी सजावट (डेकोरेशन) उभारली आहे. विद्यार्थिनींच्या या नयनरम्य सजावटीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून गेला आहे.
यासोबतच सामाजिक भान जपण्यासाठी गोदावरी फाउंडेशन व प्रस्तुत ‘रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईट’च्या (रोटरी क्लब ऑफ जळगाव एलाईट) वतीने “सहयोग निधी प्रकल्प” राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत गणेश मूर्ती विक्रीतून प्राप्त होणारा निधी अनाथ मुलांच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे.

विद्यार्थिनींच्या या सुंदर सजावटीचे व सामाजिक उपक्रमाचे परिसरात विशेष कौतुक होत आहे. या सोहळ्यास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button