Education

गरिबांची मुलेही करणार ‘एसी’मध्ये अभ्यास, जिप सीईओ मीनल करनवाल यांचा उपक्रम 

महा पोलीस न्यूज । दि.१३ जून २०२५ । सध्याच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची आवश्यकता भासते. जळगावातील उकाडा लक्षात घेता मोजक्याच विद्यार्थ्यांना वातानुकूलित अभ्यासिकेत प्रवेश घेणे शक्य होते. जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ मीनल करनवाल यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला असून त्यातून वातानुकूलित आणि सुसज्ज बैठक व्यवस्था असलेली अभ्यासिका साकारण्यात आली आहे. विद्यानिकेतन हायस्कुल शेजारी हि अभ्यासिका सकाळी १० ते ६ वेळेत सुरु राहणार असून सध्या घरून पुस्तके आणून वाचण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या 20 टक्के सेस फंडाचा योग्य आणि प्रभावी उपयोग करत शहरातील विद्यानिकेतन शाळेत विद्यार्थ्यांसाठी एक अत्याधुनिक आणि सुविधा संपन्न अभ्यासिका नुकतीच सुरु करण्यात आली आहे. या अभ्यासिकेच्या उभारणीसाठी २० लक्ष रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ही अभ्यासिका एक मौल्यवान साधन ठरणार आहे.
अभ्यासिका मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेचा लाभ घ्यावा आणि आपल्या यशाची दिशा निश्चित करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. जिल्हा परिषदेचा हा उपक्रम ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी योग्य आणि शांत अभ्यासाचे वातावरण उपलब्ध करून देतो. अभ्यास करण्याची जागा ही प्रत्येक विद्यार्थ्याची गरज आहे आणि ती गरज पूर्ण करण्याचा हा एक सकारात्मक टप्पा आहे.
  • अभ्यासिकेची प्रमुख वैशिष्ट्ये :
  • वातानुकुलीत आणि सुसज्ज बैठक व्यवस्था
  • 24×7 वीज आणि प्रशस्त प्रकाश व्यवस्था
  • 60 विद्यार्थ्यांपर्यंत बसण्याची क्षमता
  • शहराच्या मध्यवर्ती आणि सहज उपलब्ध ठिकाणी
  • स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय
  • प्रेरणादायी वातावरण व सुव्यवस्थित अभ्यास जागा

पहा संपूर्ण व्हिडिओ :

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button