Crime
हृदयद्रावक : गणेशोत्सवाच्या धामधुमीत चिमुकल्यासह आईने घेतला टोकाचा निर्णय


महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । देशभरात आज बाप्पाच्या आगमनाची धामधूम सुरू असतानाच जळगाव शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ५ वर्षीय चिमुकल्यासह आईने गळफास घेऊन जीवन संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळी शनिपेठ पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. कुटुंबीय संपूर्ण परिसरात परिचित आणि सर्वांशी मिळून मिसळून राहत असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
(सामाजिक जबाबदारीचे भान राखत मयतांची नावे आणि माहिती काही काळासाठी वगळण्यात आलेली आहे)






