Crime

ब्रेकिंग : भरधाव मालवाहू वाहनाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उडवले, एक ठार, एक जखमी

महा पोलीस न्यूज । दि.१ मार्च २०२५ । जळगाव शहरातील मास्टर कॉलनी शेरा चौकात राहणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला भरधाव मालवाहू वाहनाने चिरडल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ममुराबाद रस्त्यावर घडला. मयत विद्यार्थ्याचे नाव फैसल मुस्ताक पटेल वय २०, रा.मास्टर कॉलनी असे असून तर त्याच्यासोबत असलेला वासीक खान युसुफ खान वय २०, रा. मास्टर कॉलनी जळगाव हा जखमी झाला आहे. नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी केली आहे.

जळगाव शहरातील मास्टर कॉलनीमध्ये फैसल पटेल हा तरुण ममुराबाद रोडवरील अरुणामाई कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात बी फार्मसीच्या तृतीय वर्षाला शिक्षण घेत होता. नेहमीप्रमाणे शनिवारी १ मार्च रोजी सकाळी१० वाजेच्या सुमारास फैजल हा त्याचा मित्र वासीक याच्यासोबत दुचाकीने जळगावकडून महाविद्यालयाला ममुराबाद रोड वरून जात होते.

विटा भरलेल्या वाहनाची धडक
समोरून भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू वाहन क्रमांक (एमएच १३ एएन ४४४५) जोरदार धडक दिली. या वाहनात विटा भरलेले होते. या भीषण अपघातात फैजलचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा सोबत असलेला वासीक हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली होती.

एकुलता एक मुलगा गमावला
फैसल याचे आई-वडील आणि मावशी-मावसा हे दोघे सख्खे भाऊ आणि सख्या बहिणी होत्या. चौघांच्या कुटुंबातील फैसल हा एकुलता मुलगा होता. घरातील एकुलता एक मुलगा असल्याने आई-वडिलांसह त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. याप्रकरणी पोलिसात नोंद घेण्याचे काम सुरू आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button