Crime

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती 

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती 

मुंबई | प्रतिनिधी मुंबई पोलीस दलाच्या नेतृत्वात मोठा बदल करण्यात आला असून, सेवानिवृत्त झालेले पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यानंतर देवेन भारती यांची नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भारती सध्या विशेष पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) म्हणून कार्यरत होते. त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे व विश्वासू अधिकारी म्हणून ओळखले जाते. त्यांच्या नियुक्तीची चर्चा सध्या पोलीस वर्तुळात मोठ्या प्रमाणावर होत आहे.

फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर आयुक्तपदासाठी सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार, तसेच महिला अधिकारी अर्चना त्यागी यांची नावे चर्चेत होती. मात्र, अनुभवी आणि गुन्हेगारीविरोधी मोहिमांमध्ये प्रभावी कामगिरी केलेल्या देवेन भारती यांची निवड करण्यात आली.

भारती हे १९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी असून, त्यांनी मुंबई पोलिस दलात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. ते गुन्हे शाखेचे अपर आयुक्त, उपायुक्त, तसेच कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) प्रमुख म्हणून देखील त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button