पंचकर्म उपचार सुविधा ; डॉ. पूनम सुरवाडे यांची सेवा उपलब्ध
वमन, विरेचन,बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण प्रमुख पंचकर्म उपचार सुविधा उपलब्ध

पंचकर्म उपचार सुविधा ; डॉ. पूनम सुरवाडे यांची सेवा उपलब्ध
वमन, विरेचन,बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण प्रमुख पंचकर्म उपचार सुविधा उपलब्ध
जळगाव, प्रतिनिधी :गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालय तथा सशोंधन केंद्र येथे पंचकर्म उपचार विभागात अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. पूनम सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म उपचार सेवा सुरू करण्यात आली आहे.
महाविद्यालय व रुग्णालय हे जळगाव खुर्द येथे कार्यरत असून आयुर्वेद शिक्षण, संशोधन व रुग्णसेवेसाठी ओळखले जाते.आयुर्वेदातील पंचकर्म ही शरीरातील दोषांचे शुद्धीकरण करून आरोग्य संवर्धन करणारी महत्त्वपूर्ण चिकित्सा पद्धती मानली जाते. या विभागात वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण या प्रमुख पंचकर्म उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पंचकर्म उपचारांमुळे सांधेदुखी, मणक्यांचे विकार, त्वचारोग, स्थूलता, तणाव, निद्रानाश, पचनविकार तसेच विविध जुनाट आजारांमध्ये लाभ मिळू शकतो. महाविद्यालय प्रशासनाने नागरिकांना पंचकर्म उपचारांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी मोहीत येवले यांच्याशी ८८८८१३१६१९ या क्रमांकवर संपर्क साधावा.
पंचकर्म ही केवळ उपचार पद्धती नसून शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन राखणारी आयुर्वेदाची समग्र चिकित्सा आहे. रुग्णांच्या प्रकृतीनुसार वैयक्तिक उपचार योजना तयार करून आधुनिक सुविधा आणि पारंपरिक आयुर्वेदिक तत्त्वांचा समन्वय साधला जात आहे. डॉ. पूनम सुरवाडे






