पद्मश्री चैत्राम पवार सत्कार समितीत प्रमोद पाटील

पद्मश्री चैत्राम पवार सत्कार समितीत प्रमोद पाटील
पर्यावरण कामी शाश्वत विकासाचे उदाहरण म्हणजे बारीपाडा
जळगाव प्रतिनिधी
बारीपाड्यातील विहीरी मार्चच्या उन्हाळ्यात भरुन आहेत,विपूल वनसंपदा, मोहांची झाडे,अनेक प्रकारच्या रानभाज्यांसह पर्यावरणाबाबत बारीपाड्यात चैत्राम पवार यांचे काम अतिशय उल्लेखनीय आहे,१००%आदिवासी असलेल्या या परिसरातील त्यांच्या अहोरात्र मेहनतीची भारत सरकारने दखल घेऊन पवारांची पद्मश्री पूरस्कारा साठी यंदा निवड केली आहे, धुळे जिल्ह्यातले पवारांचा आपल्या जळगांव जिल्ह्यातर्फे जाहीर नागरी सत्कार दि.२७ मार्चला सायंकाळी ७वा. भैय्यासाहेब गंधे सभागृह ला.ना.विद्यालय जळगावला होतो आहे.
जिल्ह्यातून २२लोकांची नागरी सत्कार समिती यासाठी स्थापन करण्यात आली आहे, त्यात कासोद्याचे पर्यावरण कामी सक्रिय असलेले जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. प्रमोद अण्णा पाटील यांचा देखील समावेश या समितीत करण्यात आला आहे.
कासोद्यात प्रमोद अण्णांनी ग्रीन आर्मीची स्थापना २०१६ ला केली आहे,ही ग्रीन आर्मी ज्याचा वाढदिवस असेल त्याच्या घरी जाऊन एक रोप भेंट देते,व ती जगवण्याची हमी संबंधीतांकडून घेते,कोरोना काळात हे काम बंद पडले होते,नंतर उन्हाळ्यात सुमारे ८ क्विंटल निंबोळ्या जमा करुन त्या परिसरातील ओढे, नाल्याकाढच्या झुडपात टाकण्याचा व सीडसुईंग करण्याचा उपक्रम यशस्वी केला आहे.
यंदा कासोदा ते एरंडोल या राज्यमार्गावर वनकोठा गावापर्यंत दूतर्फा सुमारे ८०० रोपांचे वृक्षारोपण करुन दानशुरांच्या मदतीने लोकसहभागातून ट्रिगार्ड व पाणी देणेचे काम यशस्वीपणे सुरु आहे.मार्चच्या कडक उन्हात ही रोपं जगवणे एवढे सोपे नसले तरी त्यांची मेहनत सुरुच आहे.त्यांच्या या पर्यावरणाच्या कामाची दखल घेऊन चैत्राम पवारांच्या सत्कार समितीच्या आयोजकांनी त्यांचा या समितीत समावेश केला आहे.