क्रिप्टो ट्रेडिंगचे टास्क देऊन पाचोर्याच्या अभियंत्याची नऊ लाखात फसवणूक

क्रिप्टो ट्रेडिंगचे टास्क देऊन पाचोर्याच्या अभियंत्याची नऊ लाखात फसवणूक
जळगाव : प्रतिनिधी
पाचोरा येथील रहिवासी असलेल्या एका अभियंत्याला ट्रेडिंग करण्याचे टाग देऊन नऊ लाख 12 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या पकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रगत गोपाल गाडी लोहार (वय २४, रा. पाचोरा) असे फसवणूक झालेल्या अभियंत्याचे नाव आहे.,
प्रगत गाडीलोहार यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले आहे. दि. ३ फेब्रुवारी रोजी त्यांच्याशी तीन अनोळखी व्यक्तींनी व्हाटसअॅप व टेलिग्रामद्वारे संपर्क . त्यांना गुगल मॅपला रिव्ह्यू देण्यासह क्रिप्टो ट्रेडिंग करण्याचे टास्क दिले. त्यामधून त्यांना अधिकचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखविले. त्यानुसार सुरुवातीलाप्रगत यांनी चार हजार ३० रुपये गुंतवल्यानंतर त्यांना नफ्यासह पाच हजार ८३९ रुपये परतावा देण्यात आला. प्रगत यांना चार हजार ३० रुपयांच्या गुंतवणुकीवर एक हजार ८०९ रुपये नफा व मुद्दलही देण्यात आल्याने त्यातून त्यांचा विश्वास संपादन केला.
पाच दिवसात वेळोवेळी नऊ लाख १२ हजार ११४ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात स्वीकारले. नंतर मात्र त्यावर नफा व मुद्दलही परत मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रगत गाडी लोहार यांनी त्वरित सायबर पोलीस ठाणे गाठून अज्ञात तीन जणांविरुद्ध फिर्यादित दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.