यवतमाळ पोलिसांची मोठी कारवाई ; दरोडेखोरी प्रकरणातील सहा आरोपी अटकेत

यवतमाळ पोलिसांची मोठी कारवाई ; दरोडेखोरी प्रकरणातील सहा आरोपी अटकेत
45 लाखांचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ, यवतमाळ पोलिसांनी केवळ एका तासात दरोडेखोरी प्रकरणाचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, सुमारे 45 लाख किमतीची चोरीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
आज दुपारी २ वाजता, दारव्हा पोलीस निरीक्षकांकडून चोरीच्या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास केला. या फुटेजमध्ये आरोपी स्कॉर्पिओ गाडीतून पळून जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे संपूर्ण उपविभागातील पोलिस ठाण्यांना नाकाबंदीच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी खंडाळा पोलीस ठाण्याचे एसएचओ आणि शेंबाळपिंप्री चौकीच्या पोलिसांनी नाकाबंदी करून संशयित वाहनाला रोखले. गाडी अडवल्यानंतर आरोपींनी गाडी सोडून जवळच्या जंगलात पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी शेतात पाठलाग करून सहा आरोपींना ताब्यात घेतले, तर एक आरोपी अम्मू उर्फ आमिर हा पळून जाण्यात यशस्वी झाला.
पोलिसांची कारवाई आणि जप्त मुद्देमाल
प्राथमिक झडतीत आरोपींकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच, गुप्तचरांच्या माहितीच्या आधारे शोध मोहिम सुरू करण्यात आली.
महेश रामप्रसाद पिंपरण ,अशरफ खान परवेझ खान,आदर्श देवीसिंग बिताला,कार्तिक रमेश दुलगज, गणेश श्याम कोतुलवार , मोहम्मद मोबीन मोहम्मद जिलानी, सर्व राहणार नांदेड यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून देशी बनावटीची पिस्तुल मॅगझिन, जिवंत राउंड ,2 तलवारी 3 लोखंडी सळ्या 220 ग्रॅम सोने सुमारे वीस लाखांचे,
सात लाखाहून अधिक रोकड, चांदीच्या वस्तू व इतर साहित्य असे तीन लाख स्कॉर्पिओ वाहन 15 लाख, अंदाजे 45 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
फरार आरोपी अम्मू उर्फ आमिर याला पकडण्यासाठी आरसीपी, एलसीबी आणि शेंबाळपिंपरी चौकीच्या पथकांद्वारे शोध मोहीम सुरू आहे.
या कारवाईत एसएचओ देविदास पाटील, एसआय कायंदे, गोपाळ मोरे, सुरेश राठोड आणि त्यांच्या टीमने महत्वपूर्ण भूमिका बजावली. यवतमाळ पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश होऊन चोरीची संपूर्ण मालमत्ता परत मिळवण्यात यश आले आहे.