Health

जळगावात व्हॅस्क्युलर व एंडोव्हॅस्क्युलर सर्जन डॉ.अमित राणे यांची विशेष सेवा

रक्तवाहिन्यांचे आजार, डायबेटिक फूट, व्हेरिकोज व्हेन्ससह विविध समस्यांवर मिळणार तज्ज्ञ सल्ला

जळगाव । चेतन वाणी । पायातील रक्तवाहिन्यांचे आजार, व्हेरिकोज व्हेन्स, न भरून येणाऱ्या जखमा, डायबेटिक फूट यासह रक्तवाहिन्यांशी संबंधित विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी जळगावात व्हॅस्क्युलर व एंडोव्हॅस्क्युलर सर्जनची विशेष सेवा उपलब्ध झाली आहे. डॉ.अमित राणे हे शनिवार, ८ ऑगस्ट व रविवार, ९ ऑगस्ट रोजी जळगावात रुग्णांची तपासणी करून तज्ज्ञ सल्ला देणार आहेत.

डॉ.अमित राणे यांनी एमबीबीएस, डीएनबी (जनरल सर्जरी) आणि डीआरएनबी (व्हॅस्क्युलर सर्जरी) हे शिक्षण पूर्ण केले असून ते व्हॅस्क्युलर व एंडोव्हॅस्क्युलर सर्जन आहेत. त्यांनी वर्ल्ड फेडरेशन व्हॅस्क्युलर सोसायटी फेलोशिप, जिकेई युनिव्हर्सिटी, टोकियो, जपान येथे पूर्ण केली आहे.

रक्तवाहिन्यांमधील अडथळे, रक्तपुरवठ्यातील कमतरता किंवा शिरांशी संबंधित विकारांमुळे पाय दुखणे, सूज येणे, त्वचेचा रंग बदलणे, जखम उशिरा भरणे किंवा गंभीर अवस्थेत गँग्रीनसारखी समस्या निर्माण होऊ शकते. विशेषतः मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये पायावरील जखमा व रक्तपुरवठ्याच्या समस्यांकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक असते.

उपचारासाठी अनेक सुविधा उपलब्ध
डॉ. राणे यांच्याकडे व्हेरिकोज व्हेन्स, न भरून येणाऱ्या जखमा व अल्सर, चालताना किंवा विश्रांतीत पाय दुखणे, गँग्रीन, डीप व्हेन थ्रॉम्बोसिस (DVT), पल्मोनरी एम्बोलिझम, डायबेटिक फूट, एऑर्टिक अॅन्युरिझम तसेच स्ट्रोकशी संबंधित रक्तवाहिन्यांचे विकार याबाबत तज्ज्ञ सल्ला उपलब्ध होणार आहे. तसेच किडनी रुग्णांसाठी AV फिस्टुला मूल्यांकनाची सुविधाही उपलब्ध आहे.

दोन दिवस जळगावात तपासणी
डॉ. अमित राणे यांची रुग्ण तपासणी तुषार पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, महेश प्रगती मंडळासमोर, रिंग रोड, जळगाव येथे होणार आहे. शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी १ आणि सायंकाळी ४ ते ७ या वेळेत, तर रविवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत रुग्णांना तपासणीसाठी भेट देता येणार आहे. तपासणीसाठी पूर्व-अपॉईंटमेंट आवश्यक असून, रुग्णांनी ९८३३२ ८८८१८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

रक्तवाहिन्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन
पायात वारंवार वेदना होणे, चालताना त्रास जाणवणे, सूज येणे, न भरून येणाऱ्या जखमा, त्वचेचा रंग बदलणे किंवा डायबेटीस असलेल्या रुग्णांच्या पायाला जखम होणे यासारखी लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. रक्तवाहिन्यांच्या आजारांचे वेळेत निदान झाल्यास योग्य उपचारांची दिशा निश्चित करण्यास मदत होते.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button