Detection

मोक्का, खंडणी, खुनाच्या प्रयत्नातील अट्टल गुन्हेगाराला जळगाव एलसीबीने पकडले

महा पोलीस न्यूज । दि.२४ सप्टेंबर २०२४ । सोलापूर जिल्ह्यात दाखल असलेल्या मोक्का, खंडणी, खुनाचा प्रयत्न सारख्या अनेक गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी जळगावात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. एलसीबीच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून त्याला सोलापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पवन अनिल अधटराव असे आरोपीचे नाव आहे.

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर ३५९/२०२४ भा. द. वी. कलम ३०७, ३८५ वगैरे गुन्ह्यातील संशयित आरोपी पवन अनिल अधटराव हा जळगाव जिल्ह्यात आला असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबनराव आव्हाड यांनी सदर संशयित आरोपीचा शोध घेऊन त्वरित अटक करणेबाबत आदेश दिले होते.

एलसीबीच्या पथकातील अधिकारी व अंमलदार हे आरोपीचा शोध घेत असतांनाच आरोपी पवन अनिल अधटराव हा गेंदालाल मिल परिसरात असल्याचीही गुप्त माहिती बातमीदारामार्फत मिळाली. माहितीनुसार नमुद पथकाने तातडीने त्या ठिकाणी जाऊन संशयित आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव पवन अनिल अधरवट वय २६वर्ष, रा.जुन्या कोर्टाजवळ, पंढरपूर जि.सोलापूर असे सांगितले. आरोपी तोच असल्याचे सिद्ध झाल्याने त्याला त्वरित अटक करण्यात आले.

पवन अनिल अधटराव यांचा पूर्व इतिहास पहाता त्याच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आढळून आली.त्याला त्वरित अटक करुन पुढील योग्य तपास व कार्यवाहीसाठी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांच्या ताब्यात देण्यात आले.

पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, भारत पाटील यांनी पार पाडली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button