ऑटोरिक्षा चालक राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार

ऑटोरिक्षा चालक राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार
ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचा निर्णय
मुंबई / जळगाव प्रतिनिधी I राज्यातील ऑटो रिक्षा चालक अनेक अडचणींना सामोरे जात आहे. वेळोवेळी शासनाकडे मागण्या मांडूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे सरकारचे लक्ष याकडे जावे व मागण्या मान्य व्हाव्या यासाठी ऑटो रिक्षा चालक राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय
दि. ४/रोजी , मुंबई येथे ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीची राज्यव्यापी बैठकीत घेण्यात आला.
खांन्देशात हे आंदोलन जळगाव येथे होणार असुन विभागीय स्तरावर टप्पा निहाय आंदोलन करण्यात येईल ऑटोरिक्षा कॄति समितीचे अध्यक्ष मा. शशांक राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. शशांक राव सोबत समितीचे सरचिटणीस मा. विलास भालेकर , कार्याध्यक्ष प्रल्हाद सोनवणे (खांन्देश विभाग)
मारूती कोंडे ( मुंबई विभाग ), अहमद बाबा ( मराठवाडा विभाग), समितीचे सल्लागार शंकर साळवी आणि समितीचे प्रवक्ता इमरान पठाण उपस्थित होते.
यावेळी विजय पाटील, प्रकाश साखरे, राहूल वारे ,सिताराम तामाणी ,ओमिन शेख, किशन मिरेकर, नाना वैध ,अजय रामटेके ,निजामुद्दीन शेख ,ज्ञानेश्वर कोळी, श्रीरंग जाधव ,नामदेव जगताप, रंजनाताई चव्हाण, महमद मोसिन, प्रमोद वाणी ,किशोर खरताडे, किरण गवळी ,तसलीम खान, फकिरा चव्हाण, भुषण वाणी, पद्मनाभ गिते, सतिष वाघमारे यांच्यासह राज्यातील विविध संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी व रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभा संचालन समितीचे कार्याध्यक्ष मारूती कोंडे यांनी केले तर सभेची सांगता कार्याध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांनी केले. या बैठकीत खालील मुद्द्यांवर राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्व. आनंद दिघे ऑटो रिक्षा व मिटडऀ टॅक्सी कल्याणकारी मंडळातील त्रुटी दूर करा.महामंडळाची सदस्यत्व फि रद्द करा आणि लाभ स्पष्ट करा. छुप्या पद्धतीने फोटो काढून चालान
पाठवण्याची पद्धत बंद करा. गुन्हा झाला तरच चालान करा व या आधीचे सर्व चालान रद्द करा राज्य शासनाने नुकतीच ई बाईक टॅक्सीला परवानगी दिली आहे. हि ई बाईक टॅक्सी प्रवाशांच्या दृष्टीने धोकादायक आहे. तसेच ती ऑटो रिक्षा चालकांच्या उपजीवीकेवर गंडांतर आहे. तीची परवानगी रद्द करण्यात यावी महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातील अवैध वाहतूक बंद करण्यात यावी शहरातील ई बाईक व ई रिक्षा वाहतूक नियमानुसार करण्यात यावी या वाहनांना परवाना व अन्य नियम लावण्यात यावे.
उत्तर महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातील रिक्षा चालकांच्या व्यथा व समस्या प्रल्हाद सोनवणे यांनी
समितीच्या निदर्शनास आणून दिल्यात ..






