बिग ब्रेकिंग : जळगावात PWD मध्ये अधिकारी लाच घेताना जाळ्यात, वाचा बातमी…

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील एका शाखा अभियंत्याने १५ लाखांची लाच मागत ५ लाखांची लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्याला रंगेहाथ अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील एका मक्तेदाराचे एक बिल सार्वजनिक बांधकाम विभागात बाकी होते. बिलाची रक्कम मिळण्यासाठी त्यांनी शाखा अभियंता योगेश अहिरे यांच्याशी संपर्क साधला होता. बिलाची रक्कम मिळवून देण्यासाठी त्यांनी १५ लाखाची मागणी केली.
तक्रारदार लाच देण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी करून विभागाने सापळा रचला. शनिवारी दुपारच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय आवारात तडजोडी अंती ५ लाखांची लाच स्वीकारताना योगेश अहिरे यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमी चर्चेत असतो. अनेकदा त्याठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात. आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमुळेमोठी खळबळ उडाली आहे.





