कुसुंबा शिवारात गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक

कुसुंबा शिवारात गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक
एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील कुसुंबा शिवारात गावठी कट्टा बाळगणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. २ मे रोजी झालेल्या या कारवाईत पोलिसांनी चेतन वसंता देवुळकर (रा. कुसुंबा) याच्याकडून २० हजार रुपये किमतीचा अवैध गावठी कट्टा जप्त केला. त्याच्याविरुद्ध शस्त्रबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस नाईक गणेश ठाकरे यांच्या माहितीनुसार, चेतन हा बेकायदेशीर कट्ट्यासह फिरत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कुसुंबा परिसरात सापळा रचला आणि तपासणीत त्याच्याकडे गावठी कट्टा आढळला. पोलिसांनी तात्काळ शस्त्र जप्त करून चेतनला ताब्यात घेतले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहेत. या कारवाईने परिसरातील अवैध शस्त्रास्त्रे आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना चाप बसला असून, पोलिसांच्या सतर्कतेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना वाढली आहे.






