Politics

जनतेचा आग्रह : प्रा.योगिता कापडणेकर (पाटील) प्रभाग ७ मधून निवडणुकीच्या रिंगणात!

महा पोलिस न्यूज । पंकज शेटे । अमळनेर शहरातील शिक्षण महर्षी आबासो कै. व. ता. पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात ठसा उमटवलेला असतानाच, आता त्यांच्या सूनबाई प्रा. योगिता सयाजीराव (बबलू दादा) कापडणेकर (पाटील) सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात एक नवा आदर्श घेऊन प्रभाग क्रमांक ७ मध्ये आपला अनुभव घेऊन येत आहेत. व्यापक जनसंपर्क असलेल्या व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेल्या योगिताताईंना विकासकामांची सूत्रबद्ध सुरुवात करण्याची हातोटी आहे, ज्यामुळे त्या प्रभावीपणे काम करू शकतात.

योगिता यांचे पती सयाजीराव हे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचा मित्रपरिवार व नातेसंबंध मोठा आहे. या दोन्ही पती-पत्नींना सर्व समाजात आदराचे स्थान आहे. अशा धडाडीने काम करणाऱ्या, शांतपणे जनतेचे म्हणणे समजून घेणाऱ्या प्रा. योगिता यांनी आगामी अमळनेर नगरपालिका निवडणूक लढवावी म्हणून प्रभाग क्रमांक ७ मध्ये रेटा वाढत आहे. लोकांची इच्छा व आग्रह असल्याने आपण ही निवडणूक लढणार आहोत, असे त्यांनी ‘महा पोलिस न्यूज’सोबत बोलताना सांगितले.

प्रबळ दावेदार म्हणून कौल
एकूणच कापडणेकर (पाटील) परिवाराचा आपल्या प्रभागाशी असलेला संपर्क, जिव्हाळा, नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा संबंध, आणि काम करण्याची पद्धत व नम्र स्वभाव यामुळे प्रा.योगिता कापडणेकर (पाटील) या प्रभाग क्रमांक ७ मधील प्रबळ उमेदवार मानल्या जात आहेत.

माजी मंत्री व खासदारांचे आशीर्वाद
प्रा. योगिता पाटील यांनी सांगितले की, “मला अत्यंत अभिमान वाटतो की, माझा संपूर्ण परिवार नेहमीच प्रभागवासीयांच्या सुख-दुःखात सहभागी राहिला आहे. जनहिताचे कार्य करणे, समाजासाठी पुढाकार घेणे हे आमच्या सर्वांचेच ध्येय आहे. आतापर्यंत आपल्या भागात विकासाचे कार्य सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो. आपल्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली, माजी मंत्री व आमदार अनिल पाटील, खासदार संसदरत्न स्मिता वाघ व माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांच्या आशीर्वादाने व सहकार्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.”

जनतेच्या विश्वासावर निवडणूक
जनतेचा आशिर्वाद लाभल्यास आम्ही निश्चितच प्रभावी विकास कार्य करणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “आपला विश्वासाचे व आशीर्वादाचे महत्त्व आमच्यासाठी अनमोल आहे. आपल्या सर्वांचा सतत आशिर्वाद मिळावा हीच मनःपूर्वक नम्र विनंती,” असे आवाहन त्यांनी केले. यंदा योगिता या रिंगणात असल्या तरी, प्रभाग क्रमांक ७ च्या नागरिकांचा दृढ विश्वास सयाजीराव (बबलूदादा) यांच्या ‘कार्याच्या सत्तेवर आहे.

एकच ध्येय प्रभागाचा विकास
सयाजीराव पाटील आणि त्यांचे कुटुंब हे केवळ सामाजिक व राजकीय क्षेत्रातीलच नाही, तर आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत. यांचे कार्य आणि सेवा हे अविरत सुरू राहण्यासाठी आम्ही त्यांनाच निवडणार असे नागरिकांनी सांगितले. योगिता पाटील यांच्या माध्यमातून बबलूदादा यांची ‘जनतेची सेवा’ करण्याची परंपरा पुढे सुरू राहणार आहे. नागरिकांचा हा अभूतपूर्व पाठिंबा पाहता प्रभाग क्रमांक ७ मध्ये शिक्षण महर्षी आबासो कै. व. ता. पाटील परिवाराचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button